भारताच्या पारुपल्ली कश्यपला ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पध्रेच्या सलामीच्या लढतीततच अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागल़े  त्याला तैपेईच्या सहाव्या मानांकित चोऊ तियान चेन २१-१३, २१-१२ असे नमवल़े  
अन्य लढतीत  मनु अत्री व सुमिथ रेड्डी यांनी खळबळजनक विजयाची नोंद केली, तर ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा या अनुभवी जोडीने आगेकूच केली़  मनु व सुमिथ जोडीने  चेई बियाओ व होंग वेई यांच्यावर  ९-२१, २१-१७, २१-१७ असा  विजय मिळवला़    ज्वाला-अश्विनी जोडीने   मलेशियाच्या अ‍ॅमेली अ‍ॅलिसिया व फेई चोयुंग या जोडीवर  २१-१२, २०-२२, २१-१४ अशी मात केली़

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kashyap shocking loss in all england badminton championship