भारतासह जगभरातील अॅथलीटचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई मॅरॅथॉमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केनियाचे वर्चस्व राहिले. मॅरेथॉनमध्ये केनियाचा इव्हान्स रुटोचा प्रथम आला आहे. तर लॉरेन्स दुस-या क्रमांकावर आणि फिलोमिनने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
रविवारी सकाळी मोठ्या उत्साहात या मॅरॅथॉनला सुरुवात झाली. पहाटे ५.४५ मिनिटांनी हाफ मॅरेथॉनला सुरुवात झाली. ४२ किलोमीटरची फुल मॅरेथॉन सर्वाधिक प्रतिष्ठीत समजली जाते. दरवर्षी प्रमाणे यंदाही पाच विभागात मुंबई मॅरेथॉन होत आहे. हाफ मॅरेथॉनमध्ये सुधा सिंगने पहिला क्रमांक पटकावला तर कविता राऊतला दुस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पुरुष अर्धमॅरेथॉन बंगळुरुच्या इंद्रजित पटेलने जिकंली. कोची मॅथ्यू दुस-या क्रमांकांवर तर मानसिंगने तिस-या क्रमांकाने मॅरेथॉन पूर्ण केली.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jan 2014 रोजी प्रकाशित
मुंबई मॅरेथॉन: मॅरेथॉनवर केनियाचं वर्चस्व
भारतासह जगभरातील अॅथलीटचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई मॅरॅथॉमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही केनियाचे वर्चस्व राहिले.
First published on: 19-01-2014 at 10:35 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kenias ivance ruto came first in mumbai marathon