‘एगॉन आंतराष्ट्रीय टेनिस’ स्पर्धेच्या पुरूष दुहेरी गटात पहिल्या सामन्यात भारताचा टेनिसपटू लिएंडर पेसने विजय प्राप्त करत आपला, ४० वा वाढदिवस साजरा केला. दीड तास चाललेल्या या सामन्यात पेस आणि त्याचा जोडीदार राडेक स्टेपानेक या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या जोडीने क्रोएशियाचे इवान डोडिंग व मार्सेलो मेलो या जोडीवर ५-७, ७-६(५), १०-६ ने विजय प्राप्त केला. या विजयामुळे पेस आणि राडेक यांनी पूर्व-उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
लिएंडरच्या चाहत्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लिएंडरने आपल्या चाहत्यांचे आभार मानले असून, पुढील सामन्यातही चांगली कामगिरी करण्यासाठी भरपूर मेहनत घेणार असल्याचे म्हटले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 18-06-2013 at 12:51 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leander paes celebrates 40th birthday with a win