वानखेडे कसोटीत इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४०० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने दुसऱया दिवसाच्या अखेरीस १ बाद १४६ अशी मजल मारली आहे. भारतीय संघ अजूनही २५४ धावांनी पिछाडीवर असून भारताच्या हातात अजूनही ९ विकेट्स आहेत. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांनी मैदानात चांगला जम बसवला आहे. इंग्लंडच्या धावसंख्येचा पाठलाग करताना केएल राहुल २४ धावांवर बाद झाला. मोईन अलीने राहुलला क्लीनबोल्ड केले. केएल राहुल माघारी परतल्यानंंतर चेतेश्वर पुजारा आणि मुरली विजय यांनी शतकी भागीदारी रचून संघाला १०० आकडा गाठून दिला.
मुरली विजयने कसोटी कारकिर्दीतील आपले १६ वे अर्धशतक पूर्ण केले असून तो दुसऱया दिवसाचा खेळ संपला तेव्हा ७० धावांवर नाबाद आहे. तर पुजारा नाबाद ४७ धावांवर खेळत आहे. इंग्लंडच्या पहिल्या डावात पदार्पणवीर किटॉन जेनिंग्स याने सर्वाधिक ११२ धावांची खेळी साकारली, तर सामन्याच्या दुसऱया दिवशी मैदानात टीच्चून फलंदाजी करत ७६ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून अश्विनने ६ विकेट्स घेतल्या, तर रवींद्र जडेजाने चार विकेट्स मिळवल्या. भारताच्या वेगवान गोलंदाजांना यावेळी एकही विकेट मिळवता आली नाही.
 
  
     
     
     
     
     
     
     
     
     
     
 Live Updates
 भारतीय संघ अजून २५४ धावांनी पिछाडीवर, मुरली विजय ७० धावांवर, तर पुजारा ४७ धावांवर नाबाद 
  दुसऱया दिवसाचा खेळ संपला, भारत १ बाद १४६ धावा 
  विजय आणि पुजाराची १९५ चेंडूत शतकी भागीदारी 
  मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांची शतकी भागीदारी 
  ४६ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद १३८ धावा 
  पुजाराचा डीप मिड विकेटवर चौकार, भारत १ बाद १३७ धावा 
  वोक्सकडून निर्धाव षटक, भारत १ बाद १३३ धावा 
  मुरली विजयचा डीप मिड विकेटवर चौकार 
  भारतीय संघ अजून २७६ धावांनी पिछाडीवर 
  मुरली विजयचा खणखणीत षटकार, भारत १ बाद १२४ धावा 
  अँडरसनच्या षटकात केवळ एक धाव, भारत १ बाद ११८ धावा 
  मुरली विजयकडून थर्ड मॅनच्या दिशेने एक धाव 
  ३९ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ११७ धावा. (विजय- ५४ , पुजारा- ३४) 
  पुजाराचा खणखणीत चौकार 
  मुरली विजयने पूर्ण केले १५ आंतरराष्ट्रीय कसोटी अर्धशतक 
  मुरली विजयचा चौकार आणि अर्धशतक पूर्ण 
  पुजाराचा आणखी एक खणखणीत चौकार, भारत १ बाद १०४ 
  पुजाराचा डीप थर्ड मॅनच्या दिशेने चौकार 
  मोईन अलीची भन्नाट फिरकी, पुजारा बिथरला 
  दुसरा चेंडू देखील निर्धाव 
  मोईन अलीकडून पहिला चेंडू निर्धाव 
  गोलंदाजीत बदल, मोईन अलीला गोलंदाजीसाठी पाचारण 
  विजयचा स्वेअर लेगच्या दिशेने फटका, दोन धावा 
  मुरली विजय अर्धशतकाच्या उंबरठ्यावर , भारत १ बाद ९२ धावा 
  रशीदच्या फुलटॉसवर मुरली विजयचा खणखणीत चौकार 
  रशीदची अफलातून फिरकी, खेळपट्टीवर फिरकीला चांगली मदत 
  दुसऱया चेंडूवर डीप मिड विकेटवर मुरली विजयकडून दोन धावा 
  रशीदला गोलंदाजीसाठी पाचारण, पहिला चेंडू निर्धाव 
  २९ षटकांच्या अखेरीस भारत १ बाद ८० धावा 
  मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांची संयमी फलंदाजी 
 