ठाणे येथे झालेल्या हीरकमहोत्सवी राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून महाराष्ट्राच्या संभाव्य संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघांचे २३ डिसेंबरपासून यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, वारणानगर, कोल्हापूर येथे सराव शिबीर होणार आहे.
या शिबिरानंतर दोन्ही संघ ३ ते ५ जानेवारी या कालावधीत बारामती येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
महाराष्ट्राचे कबड्डी संघ –
पुरुष : विशाल माने, नीलेश शिंदे, रिशांक देवाडिगा, संग्राम जगदाळे, सचिन पाटील, गिरीश ईरनाक, महेश मोकल, सतीश खांबे, कुलभूषण कुलकर्णी, अजय जाधव, प्रवीण नेवाळे, मोमीन शेख, महेश पवार, नितीन मदने, काशिलिंग आडके, सचिन शिंगाडे, परशुराम गायकवाड, सागर खटाळे, महेंद्र राजपूत, बालाजी मडके.
महिला : स्नेहल साळुंखे, अपेक्षा टाकळे, तृप्ती भटकर, अभिलाषा म्हात्रे, अश्विनी शेवाळे, कोमल देवकर, मीनल जाधव, अद्वैता मांगले, अर्चना करडे, स्मिता पांचाळ, ललिता धरत, पुजा शेलार, दीपिका जोसेफ, स्नेहल शिंदे, किशोरी शिंदे, मयुरी पवार, ज्योती देवकर, अरुणा सावंत, सारिका जगताप, अश्विनी अदाड.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra kabaddi team likely to declared