भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता गोलंदाज वरुण अरोनच्या नेतृत्त्वात मैदानात उतरणार आहे. विजय हजारे चषक स्पर्धेत धोनी झारखंडकडून खेळणार आहे, पण या संघाचे नेतृत्त्व वरुण अरोन करणार आहे.
विजय हजारे चषकाच्या निमित्ताने धोनी २००७ नंतर पहिल्यांदाच देशांतर्गत सामन्यांमध्ये खेळताना दिसणार आहे. झारखंडच्या १५ जणांच्या संघात धोनीचा समावेश करण्यात आल्यानंतर त्याला संघाचे नेतृत्त्व करण्यासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र, धोनीने त्यास नकार दिल्याचे समजते. येत्या १० डिसेंबरपासून या स्पर्धेला सुरूवात होत आहे.