पीटीआय, क्वालालम्पूर : दोन ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधूचे मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान शुक्रवारी संपुष्टात आले. चायनीज तैपेईच्या ताय झू यिंगकडून तीन गेममधील संघर्षांनंतर सिंधूने पराभव पत्करला. याचप्रमाणे थॉमस चषकातील भारताच्या जेतेपदाचा शिलेदार एचएस प्रणॉयची वाटचालसुद्धा संपुष्टात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महिला एकेरीत सातव्या मानांकित सिंधूने टोक्यो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या द्वितीय मानांकित ताय झूविरुद्धचा सामना २१-१३, १५-२१, १३-२१ असा गमावला. या सामन्यानंतर ताय झू हिने सिंधूविरुद्धचे विजयी वर्चस्व १६-५ असे राखले आहे. सिंधूने ताय झूविरुद्ध सलग सहाव्या सामन्यात पराभव पत्करला. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावरील जोनाटन ख्रिस्टीने प्रणॉयला २१-१८, २१-१६ असे नामोहरम केले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malaysia badminton tournament sindhu pranoy defeated competition challenge ysh