Manu Bhaker, Her Mother and Neeraj Chopra Video Viral: मनू भाकेरची आई सुमेधा भाकेर आणि नीरज चोप्रा यांच्यातील संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये दोघेही उभे राहून बोलत आहेत. यादरम्यान मनूच्या आईने नीरजचा घट्ट हात धरला आहे आणि ते बोलत आहेत. यासोबतच आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये मनू भाकेर नीरजशी बोलताना दिसत आहे. मनूने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकली, तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये रौप्यपदक जिंकले.

हेही वाचा – Vinesh Phogat: “तुमचा देश किती…”, विनेश फोगट प्रकरणावरून युनायटेड वर्ल्ड रेसलिंग प्रमुखांनी भारताला दाखवला आरसा? नेमकं काय म्हणाले?

मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये एक नव्हे तर दोन कांस्यपदके जिंकली होती. मनूने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात पहिले पदक जिंकले. त्यानंतर १० मीटर एअर पिस्तूलच्या मिश्र सांघिक स्पर्धेत तिने सरबज्योत सिंगसह कांस्यपदक जिंकले. यासह, एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदके जिंकणारी मनू भाकेर ही स्वातंत्र्यानंतरची भारताची पहिली खेळाडू ठरली. तर नीरज चोप्राने भालाफेकमध्ये ८९.४५ मी. सीझन बेस्ट थ्रो करत रौप्यपदकाला गवसणी घातली. नीरजने अंतिम फेरीत पाचपैकी ४ थ्रो फाऊल केले पण तरीही त्याने एकाच थ्रोमध्ये आपले रौप्यपदक निश्चित केले, नीरज हा पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचा एकमेव खेळाडू आहे ज्याने रौप्यपदक जिंकले.

हेही वाचा – Vinesh Phogat: “विनेश फोगट प्रकरणात स्वतः खेळाडू व प्रशिक्षक जबाबदार”, IOA च्या अध्यक्ष पीटी उषा यांचे मोठे वक्तव्य

सोयरीक जुळली? मनू भाकेर व तिच्या आईसोबत नीरज चोप्राच्या व्हायरल व्हीडिओमुळे चर्चांना उधाण

नीरज चोप्रा आणि मनू भाकेरच्या आईसोबतच्या व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मनू भाकेरची आई सुमेधा भाकेर भालाफेकपटू नीरज चोप्राशी बोलत आहेत आणि यादरम्यान त्या नीरजचा हात आपल्या डोक्यावर ठेवतात आणि म्हणातात माझी अशी इच्छा आहे की… आणि आजूबाजूला जास्त आवाज असल्याने नेमकं त्यांचं काय बोलणं झाल आहे हे ऐकू आलं नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये नीरज चोप्रा आणि मनू भाकेरही संवाद साधताना दिसत होते. नीरज चोप्रा आणि मनू भाकेर हे
दोघेही हरियाणामधील आहेत.

हेही वाचा – Vinesh Phogat: विनेशने अंतिम सामन्यापूर्वी वजन वाढण्यामागे कोर्टात काय कारण सांगितलं? फोगटच्या वकिलांनी असा केला युक्तिवाद

नीरज चोप्राच्या मनू भाकेर आणि तिच्या आईसोबतच्या व्हीडिओनंतर या दोघांची सोयरीक जुळली अशी चर्चा सुरू झाली आहे. नात्याच्या चर्चा व्हायरल होऊ लागल्या. यावर सोशल मीडिया यूजर्स वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एकाने म्हटलं – लग्नाची चर्चा आहे. दुसऱ्याने म्हटलं की, ‘एक भारतीय आई तिच्या मुलीच्या लग्नाबद्दल एका यशस्वी मुलाशी बोलत आहे.’ तिसऱ्या युझरने म्हटले, ‘मम्मी जावई शोधण्याच्या मोहिमेवर आहे.’ एकजण पुढे म्हणाला – बेटा, माझ्या मुलीशीच लग्न कर.

तर काही युजर्स ही अफवा पसरवणाऱ्यांना सुनावतानाही दिसले. एकाने लिहिले- मुलगा आणि मुलगी एकमेकांशी छान बोलले तर भारतातील लोक याच गोष्टींचा विचार करू लागतात. तर एकाने लिहिले – भारतात लोक बॉलीवूडचे रायटर्स म्हणूनच जन्माला येतात.