परवानगी न घेता आयपीएलचा एलिमिनेटर सामना आयोजित केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. या सामन्याच्या आयोजनाच्या पाश्र्वभूमीवर स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याचा सीसीआयचा परवाना का रद्द होऊ नये अशी विचारणा एमसीएने केली आहे. उत्तर देण्यासाठी त्यांना दहा दिवसांचा कालावधी दिला आहे असे एमसीएने स्पष्ट केले.
बीसीसीआयशी संलग्न असलेल्या सीसीआयने २८ मे रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील एलिमिनेटरचा सामना आयोजित केला होता. ही लढत चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार होती. मात्र स्टेडियममधील काही स्टँड्सच्या निर्मित्तीप्रकरणी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशन आणि चेन्नई महानगर पालिका यांच्यातील वादामुळे ही लढत चेन्नईऐवजी मुंबईला हलवण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jun 2014 रोजी प्रकाशित
एमसीएची सीसीआयला कारणे दाखवा नोटिस
परवानगी न घेता आयपीएलचा एलिमिनेटर सामना आयोजित केल्याप्रकरणी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) क्रिकेट क्लब ऑफ इंडियाला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे.
First published on: 07-06-2014 at 05:18 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca issues showcause notice to cci