ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनला दुखापत झाल्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.
मिचेल जॉन्सनच्या उजव्या पायाच्या टाचेला दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याच्या टी-२० विश्वचषकात खेळण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सनला संघात समाविष्ट करुन घेण्याबाबतचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. येत्या रविवारी ऑस्ट्रेलिया संघ टी-२० विश्वचषकासाठी बांगलादेशकडे रवाना होणार आहे.
मिचेल जॉन्सनने आपल्या वेगवान गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अॅशेस मालिकेत महत्वाची कामगिरी निभावली होती. त्यामुळे संघाच्या वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणाऱया जॉन्सनची अनुपस्थिती ऑस्ट्रेलियाला टी-२० विश्वचषकात महागात पडण्याची दाट शक्यताही आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mitchell johnson has right toe infection will be monitored closely