भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सलामीवीर रोहित शर्मा यांच्याशिवाय संघातील अन्य खेळाडूंच्या हेल्मेटवर राष्ट्रध्वजाचे स्टिकर पाहायला मिळते, पण भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या हेल्मेटवर मात्र असा तिरंगा दिसत नाही. धोनीच्या हेल्मेटवर फक्त बीसीसीआयचा लोगो असल्याचे पाहायला मिळते. धोनीच्या हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर दिसत नाही याला खास कारण आहे. धोनी भारताच्या यष्टिरक्षकाची जबाबदारी पार पाडतो. क्षेत्ररक्षणाच्या दरम्यान अनेकदा त्याला हेल्मेट काढून जमीनीवर ठेवावे लागते. हेल्मेट जमिनीवर ठेवल्यानंतर राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यामुळेच धोनीने त्याच्या हेल्मेटवर तिरंग्याचे स्ट्रिकर लावलेले नाही. नियमानुसार, राष्ट्रध्वज असणारया वस्तूंना जमिनीवर ठेवणे राष्ट्रध्वजाचा अपमान ठरते. त्यामुळेच राष्ट्रध्वजाच्या सन्माना प्रती धोनीच्या हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर दिसत नाही. २०११ च्या विश्वचषकात महेंद्रसिंह धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा दिसला होता. पण त्यानंतर तो धोनीने हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर वापरणे बंद केले. हेल्मेटवर भारतीय राष्ट्रध्वजाच्या स्टिकरला प्राधान्य देणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पहिला भारतीय क्रिकेटर आहे. सचिननंतर भारतीय संघातील अनेक क्रिकेटर्स हेल्मेटवर तिरंग्याचे स्टिकर वापरताना दिसते. विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना अनेकजण सचिनप्रमाणे बीसीसीआयच्या लोगोच्या वर तिरंग्याला स्थान देतात.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2018 रोजी प्रकाशित
…म्हणून धोनीच्या हेल्मेटवर तिरंगा नसतो
याला खास कारण आहे
Written by लोकसत्ता टीम

First published on: 02-03-2018 at 01:43 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ms dhoni refuses to indian flag on his helmet