भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. पुढील वर्षी मार्च-एप्रिलमध्ये भारतात आयोजित केली जाणारी विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धा यशस्वी करणे हेच आमचे ध्येय आहे, असे बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी सांगितले. ते म्हणाले, आयसीसी या स्पर्धेबाबत जे निर्णय घेईल, त्याची योग्यरीतीने अंमलबजावणी करणे हे आमचे काम आहे. या स्पर्धेत आठ संघांचा समावेश राहील व स्पर्धेतील सामन्यांची कार्यक्रमपत्रिका लवकरच आयसीसीकडून निश्चित केली जाईल.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2015 रोजी प्रकाशित
विश्वचषक यशस्वी करणे हेच आमचे ध्येय – ठाकूर
भारतात आयोजित केली जाणारी विश्वचषक ट्वेन्टी२० स्पर्धा यशस्वी करणे हेच आमचे ध्येय आहे,
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
Updated:
First published on: 10-11-2015 at 00:01 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Our goal is to succeed in the world cup anurag thakur