लंडनच्या हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांमुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मसाजिस्ट मलंग अली यांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. मात्र पत्नी आजारी असल्याने आपण पाकिस्तानात परतल्याचे अली यांनी म्हटले आहे.
‘‘पाकिस्तानी संघाच्या मसाजिस्टने आपला लैंगिक छळ झाल्याची तक्रार एका महिला कर्मचाऱ्याने केल्याचे हॉटेल व्यवस्थापनाने पाकिस्तानी संघ व्यवस्थापनाला कळवले आहे. संघ व्यवस्थापनाने या प्रकरणी चौकशी केल्यानंतर दोषी आढळलेल्या मलंग यांना मायदेशी पाठवण्यात आले. मायदेशी परतल्यावर पाकिस्तानी क्रिकेट मंडळातर्फे चौकशी करण्यात आल्यानंतर मलंग यांनी पदावरून काढून टाकण्यात आले,’’ असे सूत्रांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jul 2013 रोजी प्रकाशित
लैंगिक छळवणुकीच्या आरोपांमुळे पाकिस्तानच्या मसाजिस्टची मायदेशी रवानगी
लंडनच्या हॉटेलमधील एका महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपांमुळे पाकिस्तानी क्रिकेट संघाचे मसाजिस्ट मलंग अली यांची मायदेशी रवानगी करण्यात आली आहे. मात्र पत्नी आजारी असल्याने आपण पाकिस्तानात परतल्याचे अली यांनी म्हटले आहे.
First published on: 04-07-2013 at 06:52 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pak masseur was sent back after sexual harassment allegations