Pakistan vs South Africa: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना रावळपिंडीच्या मैदानावर पार पडला. या सामन्यासाठी पाकिस्तानने रँक टर्नर खेळपट्टी तयार केली होती. पण पाकिस्तानचे खेळाडू आपल्याच जाळ्यात अडकले आहेत. दक्षिण आफ्रिकेने हा सामना ९ गडी राखून आपल्या नावावर केला. यासह मालिका १-१ ने बरोबरीत आणली आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजी करताना केशव महाराजने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात २ गडी बाद केले. तर सायमन हार्मरने पहिल्या डावात गोलंदाजी करताना २ आणि दुसऱ्या डावात ६ गडी बाद केले.
या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानने ३३३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४०४ धावा केल्या. यासह पहिल्या डावात ७१ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेकडून फलंदाजी करताना ट्रिस्टन स्टब्सने ७६ धावांची खेळी केली. तर एडेन मारक्रमने ३२ आणि ४२ धावांची खेळी केली. तर टॉनी जे जॉर्जीने ५५ आणि मुथुसामीने नाबाद ८९ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेचा संघ अडचणीत होता.दक्षिण आफ्रिकेचे ८ फलंदाज २३५ धावांवर माघारी परतले होते. त्यानंतर शेवटच्या २ फलंदाजांनी टिचून फलंदाजी केली आणि दक्षिण आफ्रिकेला मजबूत स्थितीत पोहोचवलं.
केशव महाराज आणि मुथुसामी यांनी मिळून ९ व्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या. महाराज बाद होऊन माघारी परतल्यानंतर कगिसो रबाडा फलंदाजीला आला. त्याने रबाडाने ७१ धावांची खेळी केली. मुथुसामी आणि रबाडाने दहाव्या विकेटसाठी ९८ धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. या भागीदारीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने सामन्यावरील पकड आणखी मजबूत केली.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानलाही हवी तशी कामगिरी करता आली नाही. संघातील ४ फलंदाज अवघ्या ६० धावांवर माघारी परतले. त्यानंतर बाबर आझमने ५० आणि मोहम्मद रिझवानने १८ धावांची खेळी करून पाकिस्तानला पुनरागमन करून दिलं. पण चौथ्या दिवशी बाबर आझम बाद होऊन माघारी परतला. पाकिस्तानचा दुसरा डाव अवघ्या १३८ धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकण्यासाठी अवघ्या ६८ धावांचे आव्हान मिळाले. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेकडून रेयान रिकल्टनने २५ आणि कर्णधार एडेन मारक्रमने ४२ धावांची खेळी केली. यासह दक्षिण आफ्रिकेने ८ गडी राखून विजयाची नोंद केली. हा दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानविरूद्ध पाकिस्तानमध्ये खेळताना १८ वर्षांनंतर मिळवलेला पहिलाच कसोटी विजय आहे.