बाबर आझम (Babar Azam) हा एक पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू (Pakistani Cricketer) आहे, जो सर्व फॉरमॅटमध्ये पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार (Pakistan Captain) आहे. त्याचे संपूर्ण नाव मोहम्मद बाबर आझम आहे. उजव्या हाताचा अव्वल फळीतील फलंदाज, जगातील सर्वोत्तम समकालीन फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखला जातो. बाबर आझम हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २५०० धावा करणारा फलंदाज आहे, त्याने ६२ डावात २५०० धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता ज्याने ६८ डावात २५०० धावा केल्या होत्या.Read More
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा (आयसीसी) वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटू आणि वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला