Pakistan Former Cricketers Reaction on PAK vs BAN Test Defeat: बांगलादेशविरुद्ध लागोपाठ दोन सामन्यांत पाकिस्तानचा पराभव झाल्यानंतर पाकिस्तान संघाला मोठ्या ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. बांगलादेशने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच पाकिस्तानचा पराभव केला, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांगलादेशने पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर क्लीन स्वीप करत २-० ने मालिका जिंकली. या पराभवानंतर केवळ पाकिस्तानी संघाचा कर्णधार शान मसूदच नाही, तर संघ व्यवस्थापन आणि पीसीबीही आता ट्रोल होत आहेत. पाकिस्तानी संघाचे माजी खेळाडू पाकिस्तान संघाच्या कामगिरीवर चांगलेच भडकले आहेत. या पराभवामुळे पाकिस्तानचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग जवळपास बंद झाला आहे. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी पाकिस्तानी संघाच्या या साधारण कामगिरीवर भाष्य केले आहे. आपली नाराजी व्यक्त करत हे खेळाडू नेमकं काय म्हणाले, जाणून घ्या.

हेही वाचा – Hardik-Natasa: घटस्फोटानंतर लेक अगस्त्य पहिल्यांदा पोहोचला हार्दिक पंड्याच्या घरी, कृणालच्या पत्नीने शेअर केलेला VIDEO व्हायरल

क्रिकेट या स्तरावर पोहोचले आहे हे फारचं त्रासदायक – जावेद मियांदाद

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानच्या पराभवानंतर माजी कसोटी कर्णधार जावेद मियांदाद म्हणाले की, आमचं क्रिकेट या स्तरावर पोहोचले आहे हे फारचं त्रासदायक आहे. बांगलादेश त्यांच्या कामगिरीचे श्रेय घेण्यास पात्र आहे, परंतु या मालिकेत पाकिस्तानची फलंदाजी बाजू ज्या प्रकारे कोलमडली तो पाहता हा एक वाईट संकेत आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजेच पीसीबीमधील मतभेदामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास कमी झाल्याचे मियांदाद यांचे मत आहे. ते म्हणाले की मी फक्त खेळाडूंना दोष देणार नाही कारण पीसीबीमध्ये गेल्या दीड वर्षात जे काही घडले आहे आणि कर्णधार व व्यवस्थापनातील बदलाचा परिणाम संघावर झाला आहे.

हेही वाचा – WTC 2025 अंतिम फेरीची तारीख जाहीर, ICC ने केली घोषणा; पहिल्यांदाच ‘या’ मैदानावर होणार फायनल

इंझमाम उल हक आणि युनूस खान पराभवामुळे दु:खी

माजी कर्णधार इंझमाम उल हक यांनी सांगितले की, तीन मालिका गमावणे आणि १० कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवता न येणे हे चिंताजनक आहे. ते म्हणाले की, “मायदेशातील मालिका ही सर्वोत्तम संघांना पराभूत करण्याची एक उत्तम संधी मानली जाते, परंतु त्यासाठी फलंदाजांनी धावा करणे आवश्यक आहे.” अनुभवी फलंदाज युनूस खान म्हणाले की, जेव्हा एखादा संघ मानसिकदृष्ट्या पराभूत होण्याच्या मार्गावर जातो, तेव्हा त्यांना पुनरागमन करणे कठीण होते. पुढे म्हणाले की, “पाकिस्तानी फलंदाजांनी यापूर्वी धावा केल्या आहेत, मात्र आता या संकटावर मात करण्यासाठी त्यांना मानसिकदृष्ट्या खंबीर होण्याची गरज आहे.”

हेही वाचा – Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

अहमद शहजाद

पाकिस्तानचा माजी कसोटी फलंदाज शहजाद अहमदने बांगलादेशच्या वेगवान गोलंदाजांविरूद्ध फलंदाजी करू न शकणाऱ्या खेळाडूंना चांगलंच सुनावल. तो म्हणाला, “पाकिस्तानी फलंदाज जर घरच्या मैदानावर वेग हाताळू शकत नसेल तर पाकिस्तानचे भविष्य फार काही चांगले नाहीय.” कसोटी प्रशिक्षक जेसन गिलेस्पी आणि टी-२० वनडेमधील प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी पीसीबी आणि निवडकर्त्यांना घाबरू नका असा सल्ला दिला आहे, कारण यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास आणखी कमी होईल. दरम्यान, गिलेस्पी आणि प्रशिक्षक टिम नीलसन थोड्या विश्रांतीसाठी ऑस्ट्रेलियाला परतणार आहेत.