सोळाव्या शतकामध्ये दक्षिण-पूर्व इंग्लंडमध्ये क्रिकेटचा उद्य झाला असे म्हटले जाते. ब्रिटीशांच्या वसाहतवादी धोरणांमुळे हा खेळ जगभर पोहचला. १८७७ मध्ये पहिला कसोटी क्रिकेट सामना (Cricket News) मेलबर्न येथे खेळला गेला. १९ व्या शतकाच्या सुरुवातीला क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय सामने आयोजित केले गेले.
कालांतराने क्रिकेटला ग्लॅमर आले आणि हा खेळ प्रसिद्धी देत गेला. भारतामध्ये क्रिकेट सर्वप्रथम मुंबई शहरामध्ये खेळला गेला. क्रिकेटशी संबंधित नियोजन करणाऱ्यासाठी आयसीसी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत दौरे, टूर्नामेंट्स तसेच विश्वचषक यांसंबधित सर्व गोष्टींवर लक्ष देत असते.
क्रिकेटच्या काही चाहत्यांसाठी हा खेळ नसून तो त्यांचा धर्म आहे. सध्याच्या घडीला फुटबॉल हा खेळ जगामध्ये सर्वात जास्त खेळला जातो. लोकप्रियतेच्या बाबतीमध्ये फुटबॉल पहिल्या क्रंमाकावर असून क्रिकेट खेळाचा क्रंमाक दुसरा आहे. Read More
Naveen Ul Haq 13 ball Over: हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध खेळल्या पहिल्या टी-२० सामन्यात अफगाणिस्तानला ४ विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला.…
Retired Cricketers in 2024: २०२४ मध्ये क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला अलविदा केला आहे. रोहित-विराटसारख्या खेळाडूंनी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली…