आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा २५ जानेवारीपासून

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेसाठी पाकिस्तानी नेमबाजपटू पुढील महिन्यात भारतात येणार आहेत. ही स्पर्धा २५ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नवी दिल्लीतल्या डॉ. कर्नी सिंग रेंजवर होणार आहे. ‘‘ऑलिम्पिकमधील कोटा निश्चित करण्यासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे,’’ अशी माहिती पाकिस्तान रायफल असोसिएशनचे उपाध्यक्ष राझी अहमद खान यांनी दिली.

ऑक्टोबरमध्ये नवी दिल्लीत झालेल्या आठव्या आशियाई एअरगन अजिंक्यपद स्पध्रेतून पाकिस्तानी संघाने माघार घेतली होती, परंतु गतमहिन्यात कुवैतमध्ये झालेल्या आशियाई नेमबाज अजिंक्यपद स्पध्रेत पाकिस्तानने १२ सदस्यीय संघ पाठवला होता. खासगी संकेतस्थळाच्या माहितीनुसार भारतात होणाऱ्या आशियाई ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेकरिता पाकिस्तानचा संघ लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistani shooter player come to india for asian olympic game