क्रिकेटचे मैदान हे कायम अनिश्चित घटनांसाठी ओळखले जाते. क्रिकेटच्या सामन्यात केव्हा काय होईल याचा काहीही नेम नसतो. कधी एखादा फलंदाज सामना फिरवतो, तर कधी एखादा गोलंदाज हातात असलेला सामना सुमार कामगिरीमुळे गमावतो. काही वेळा मैदानात दोन संघांच्या खेळाडूंमध्ये वाद होतात, तर काही वेळा एखादा खेळाडू थेट अंपारशीच वाद घालतो. असे अनेक चित्रविचित्र किस्से क्रिकेटच्या मैदानावर घडत असतात. मात्र नुकताच क्रिकेटच्या मैदानावर एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली.

पाकिस्तानी क्रिकेटमध्ये सोमवारी एक अत्यंत वाईट घटना घडली. पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या एका स्थानिक सामन्यात अंपायरला हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. नसीम शेख असे या पाकिस्तानी अंपाअरचे नाव असून ते ५६ वर्षांचे होते.

पंच नसीम खान

एका क्लब टूर्नामेंट सामन्यादरम्यान पंच म्हणून काम पाहताना शेख यांना अचानक हृदय विकाराचा झटका आला. त्या झटक्याने ते जमिनीवर कोसळून पडले. या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थितीत असलेल्या लोकांनी त्यांच्यासाठी स्ट्रेचर बोलावले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वीच शेख यांचा मृत्यू झाला.