पाकिस्तानचा यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) २०२१ वर्षातील सर्वोत्कृष्ट पुरुष टी-२० क्रिकेटपटू (ICC Mens T20I Cricketer Of 2021) म्हणून गौरवण्यात आले आहे. रिझवानने २०२१ साली टी-२० क्रिकेटमध्ये फलंदाजीत दमदार कामगिरी केली. गेल्या वर्षी त्याने २६ डावांत ७३.६६ च्या सरासरीने १३२६ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने एक शतक आणि १२ अर्धशतके झळकावली. त्याने गेल्या वर्षी टी-२० क्रिकेटमध्ये २२ झेल आणि २ स्टम्पिंगही केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) सर्वोत्तम पुरुष टी-२० संघाची घोषणा केली. यामध्ये बाबर आझमला कर्णधार आणि मोहम्मद रिझवानला यष्टीरक्षक म्हणून स्थान मिळाले. या संघात एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नव्हता. गेल्या वर्षी रिझवानने टी-२० क्रिकेटमध्ये शानदार फलंदाजी केली होती. त्याने २९ सामन्यात १३५च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या. यादरम्यान त्याने टी-२० मध्ये सर्वाधिक ११९ चौकार मारले.

हेही वाचा – IND vs WI: करोनामुळे वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत ‘मोठा’ बदल; आता ‘या’ दोनच शहरात होणार सामने!

वर्ल्डकपमध्ये चमकला रिझवान

यूएई आणि ओमानमध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकातही रिझवानने शानदार फलंदाजी केली होती. पाकिस्तानला उपांत्य फेरीत नेण्यात त्याचा आणि कर्णधार बाबर आझमचा महत्त्वाचा वाटा होता. बाबर या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने ६ सामन्यात ३०३ धावा केल्या होत्या. तर रिझवान धावांच्या बाबतीत तिसऱ्या स्थानावर होता. त्याने ६ सामन्यात तीन अर्धशतकांच्या मदतीने २८१ धावा केल्या.

More Stories onआयसीसीICC
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pakistans mohammad rizwan named icc mens t20i cricketer of 2021 adn
First published on: 23-01-2022 at 14:33 IST