2024 Paris Olympic Highlights Day 4: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवशी मंगळवारी (३० जुलै) मनू भाकेर आणि सरबज्योत सिंग यांनी कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. त्यांनी कोरियन जोडीचा पराभव केला. ट्रॅप नेमबाज पृथ्वीराज तोंडइमान पुढल्या फेरीत जाऊ शकला नाही. भारतीय हॉकी संघाने आपली विजयी घोडदौड कायम ठेवत आयर्लंडचा २-० असा पराभव केला. अर्जेंटिनाविरुद्धचा सामना अनिर्णित राहिल्यानंतर भारताला आयर्लंडसारख्या बलाढ्य संघाचा सामना करावा लागणार आहे. बॅडमिंटनमध्ये सात्विक-चिराग या जोडीने उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. परंतु आजचा सामना जिंकत ही जोडी क गटात अव्वल राहिली आहे. अमित पंघाल आणि जास्मिन यांना बॉक्सिंगमध्ये पराभव पत्करावा लागला. तर भारताची भजन कौर तिरंदाजीत राऊंड ऑफ १६मध्ये पोहोचली आहे.
India at Paris Olympic 2024 Live Updates: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ च्या चौथ्या दिवसाचे लाइव्ह अपडेट्स
तिसऱ्या शॉटनंतर भारतीय संघ ६-२ ने आघाडीवर
??? ???? ??????: #Shooting - Mixed team 10m Air Pistol (Final)
— Sportwalk Media (@sportwalkmedia) July 30, 2024
– India claims fourth set as well, what a start!
– Score: India 6 – 2 South Korea
? ?????? @sportwalkmedia ??? ????????? ???????? ?? ?????? ???????? ??…
मनू भाकेर-सरबज्योत सिंगच्या कांस्यपदक सामन्याला सुरूवात झाली आहे. दुसऱ्या शॉटनंतर भारत-कोरिया बरोबरीत
??? ???? ??????: #Shooting - Mixed team 10m Air Pistol (Final) – End of 2nd set
— Sportwalk Media (@sportwalkmedia) July 30, 2024
– India claims the second set!
– Score: India 2 – 2 South Korea
? ?????? @sportwalkmedia ??? ????????? ???????? ?? ?????? ???????? ??…
पुरुष दुहेरी (ग्रुप स्टेज):
सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी विरुद्ध अल्फियान फजर आणि मुहम्मद रियान अर्दियांतो (इंडोनेशिया) – संध्याकाळी ५:३०
महिला दुहेरी (ग्रुप स्टेज):
अश्विनी पोनप्पा आणि तनिषा क्रॅस्टो विरुद्ध सेत्याना मापासा आणि अँजेला यू (ऑस्ट्रेलिया) – संध्याकाळी ६:२०
महिला वैयक्तिक १/३२ एलिमिनेशन फेरी: अंकिता भकट (सायंकाळी ५:१५) आणि भजन कौर (सायंकाळी ५:३०)
पुरुषांची वैयक्तिक १/३२ एलिमिनेशन फेरी: धीरज बोम्मादेवरा (रात्री १०:४५)
श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी यांच्या ट्रॅप नेमबाजी सामन्याला सुरूवात झाली आहे. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आहे. नेमबाजांच्या यादीतील टॉप-६ नेमबाज पुढील फेरीसाठी पात्र होतील. आज शऑट्सचे ३ राऊंड होतील आणि उर्वरित दोन राऊंड दुसऱ्या दिवशी होतील आणि मग पात्रता फेरीचा निकाल मिळेल.
https://twitter.com/sportwalkmedia/status/1818179856267370850
तीन भारतीय बॉक्सर बॉक्सिंगमध्ये उतरणार आहेत.
पुरुषांची ५१ किलो सर्वाेत्तम १६ ची फेरी:
अमित पंघाल विरुद्ध पॅट्रिक चिनयेम्बा (झांबिया) – संध्याकाळी ७:१५
महिलांची ५७ किलो सर्वाेत्तम ३२ ची फेरी:
जास्मिन लॅम्बोरिया विरुद्ध नेस्टी पेटेसिओ (फिलीपिन्स) – रात्री ९:२५
महिलांची ५४ किलो सर्वाेत्तम १६ ची फेरी:
प्रीती पवार विरुद्ध येनी मार्सेला एरियास (कोलंबिया) – दुपारी १:२० (31 जुलै)
ट्रॅप पुरुष पात्रता: पृथ्वीराज तोंडाईमन – दुपारी १२.३० वा
ट्रॅप महिला पात्रता: श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी कुमारी – दुपारी १२.३०
१० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक कांस्यपदक सामना: भारत (मनु भाकेर आणि सरबज्योत सिंग) विरुद्ध कोरिया – दुपारी १ वा.
पृथ्वीराज तोंडाईमन दुपारी १२.३० वाजता ट्रॅप पुरुषांच्या पात्रतेत भाग घेईल. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ चा आज चौथा दिवस आहे. भारताला आतापर्यंत नमबाजीत कांस्य पदक जिंकता आलं आहे. आज भारताला नेमबाजीत पदकाची आशा असेल. भारतीय हॉकी संघाचा तिसरा सामना आयर्लंडशी होणार आहे. अमित पंघालचा सामना पॅट्रिक चिन्येम्बा याच्याशी होणार आहे.