Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सर्वच खेळाडू पदकांसाठी लढत देताना दिसत आहेत. प्रत्येक खेळाडू सर्वात मोठी स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत. पण या सगळ्या दरम्यान ऑलिम्पिकमध्ये एक असा पराक्रम पाहायला मिळाला, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ग्रेट ब्रिटनच्या एका खेळाडूने पुरुष आणि महिला अशा दोन्ही स्पर्धांमध्ये पदक जिंकून इतिहास रचला आहे.

हेही वाचा – Paris Olympic 2024 Live, Day 9: भारताचा हॉकी संघ सेमीफायनलमध्ये, लक्ष्य सेनकडून एक पदक निश्चित

Paris Olympics 2024: ऑलिम्पिकच्या इतिहासातील मोठी घटना

ग्रेट ब्रिटनचा रोइंग ॲथलीट हेन्री फील्डमॅनचे नाव ऑलिम्पिक इतिहासात नोंदवले गेले आहे. हेन्री फील्डमॅन हा पुरुष आणि महिला अशा दोन्ही प्रकारात पदक जिंकणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ग्रेट ब्रिटनच्या महिला रोइंग संघासह रौप्य पदक जिंकले आहे. यापूर्वी त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पुरुष संघासह कांस्यपदक जिंकले होते हेन्री फील्डमॅनच्या धक्कादायक पराक्रमाचे कारण म्हणजे रोइंग स्पोर्टचे नियम.

हेही वाचा – Paris Olympics 2024: गोल्ड मेडलनंतर मिळाली डायमंड रिंग, बॅडमिंटन कोर्टमध्येच चिनी खेळाडूने गर्लफ्रेंडला असं केलं प्रपोज, VIDEO व्हायरल

Paris Olympics 2024: हेन्री फिल्डमॅनने कशी जिंकली महिला-पुरूष रोईंगमध्ये पदकं?

हेन्री फील्डमॅन रोइंगमध्ये कॉक्सस्वेनची भूमिका करतो. रोइंगमध्ये संपूर्ण संघाचे नेतृत्व करणाऱ्या ॲथलीटला कॉक्सवेन म्हणतात. या खेळाच्या दोन्ही श्रेणींमध्ये, ८ खेळाडूंच्या रोइंग क्रूमधील कॉक्सस्वेन पुरुष किंवा महिला असू शकतात. म्हणजे महिला संघात एक पुरुष कॉक्सवेन आणि पुरुषांच्या संघात एक महिला कॉक्सस्वेन असू शकते. या नियमामुळे हेन्री फील्डमनने दोन्ही प्रकारात पदके जिंकण्याचा पराक्रम केला आहे. हा नियम २०१७ मध्ये रोइंगमध्ये लागू करण्यात आला होता आणि नंतर पुरुषही महिला बोटींमध्ये सामील होऊ लागले. त्यामुळे फील्डमॅनसारख्या खेळाडूंना संधी निर्माण झाली.

हेही वाचा – MS Dhoni: ‘यारी तेरी.. मुझे जिंदगी से भी प्यारी है…’ जोगिंदर शर्माने धोनीला १२ वर्षांनी भेटल्यानंतर शेअर केली खास पोस्ट

ऐतिहासिक कामगिरीनंतर फील्डमॅन म्हणाला की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये आमच्यासाठी सर्व कठीण होतं कारण त्यावेळी करोना सुरू होता. पण पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आमच्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली. आम्ही एका संघाप्रमाणे खेळलो आणि आम्ही यशस्वी झालो. स्त्री-पुरुषांच्या स्पर्धा वेगवेगळे होते. मात्र सर्वांनी मिळून सहकार्य केले. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रिटनच्या महिला संघाने ०.६७ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्य पदक जिंकले. त्याचबरोबर कॅनडाच्या संघाने सुवर्णपदक पटकावले आहे.