प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात पुणेरी पलटनच्या संघाची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. आज रंगलेल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने पुणेरी पलटनचा ३१-२६ असा पराभव केला. यासह जयपूरने सलग तीन पराभवानंतर पहिला विजय नोदवला आहे. या विजयासह जयपूरचा संघ सातव्या क्रमांकावर पोहोचला. पुणेरी पलटनने सात सामन्यात पाचवा पराभव पत्करला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जयपूरकडून अर्जुन देशवालने सर्वाधिक ११ गुणांची नोंद केली. तर पुण्याकडून कमकुवत बचाव पाहायला मिळाला. पलटनचे नितीन तोमर, मोहित गोयत हे अपेक्षेनुसार चांगली कामगिरी करू शकले नाहीत. तर जयपूरकडून अमित शॉल कुमार आणि संदीप कुमार धुल यांनी चांगला बचाव करत संघांच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हेही वाचा – Pro Kabaddi League : हरयाणा स्टीलर्सचा गतविजेत्यांना धक्का; बंगालच्या मनिंदर सिंगची कामगिरी व्यर्थ!

दोन्ही संघ

जयपूर पिंक पँथर्स : अर्जुन देशवाल, दीपक निवास हुडा, संदीप कुमार धुल, नवीन, धरमराज चेरालाथन, अमित हुडा, अमीर हुसेन मोहम्मदमालेकी, मोहम्मद अमीन नसराती, अमित शॉल कुमार, अमित नगर, अशोक विशाल, नितीन रावल, सचिन नरवाल, पवन टीआर, सुशील गुलिया, इलावरसन ए.

पुणेरी पलटण: पवन कुमार कादियान, हादी ताजिक, बाळासाहेब शाहजी जाधव, पंकज मोहिते, संकेत सावंत, गोविंद गुर्जर, मोहित गोयल, व्हिक्टर ओनयांगो ओबिएरो, विशाल भारद्वाज, बलदेव सिंग, राहुल चौधरी, नितीन तोमर, ई सुभाष, सोम्बीर, कर्मावेकर, अवनीश नादराजन, सौरव कुमार.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pkl 2021 22 jaipur pink panthers vs puneri paltan latest score adn