Pro Kabaddi League : हरयाणा स्टीलर्सनं दबंग दिल्लीला हरवलं; यूपी योद्धानं नोंदवली हॅट्ट्रिक!

यूपी योद्धानं गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा ४०-३६ असा पराभव केला.

pkl dabang delhi vs haryana steelers and bengal warriors vs up yoddha
प्रो कबड्डी लीग

प्रो कबड्डी लीगच्या (PKL 8) ६८व्या सामन्यात हरयाणा स्टीलर्सने दबंग दिल्लीचा ३६-३३ असा पराभव करत रोमांचक विजय नोंदवला. हरयाणाचा या मोसमातील हा पाचवा विजय आहे, तर दिल्लीचा तिसरा पराभव आहे. काल बंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात झालेली घटना पुन्हा या सामन्यात पाहायला मिळाली. विजयच्या रेडमुळे हरयाणा स्टीलर्सचे ५ खेळाडू लॉबीत गेले आणि दबंग दिल्लीने ५ गुणांची कमाई केली.

दुसऱ्या सत्रात दिल्लीने आक्रमक खेळ केला. त्यांनी सातत्याने गुण घेणे सुरू ठेवले. दिल्लीला हरयाणा संघाला ऑलआऊट करण्यात यश आले. अखेरच्या तीन मिनिटात सामना बरोबरीत आला होता. मात्र, दिल्लीचा कर्णधार मनजीत छिल्लरने पंचाशी वाद घातला आणि दोन मिनिटात त्याला निलंबित केले. याचा फायदा हरयाणाला झाला. या सामन्यात विकास कंडोलाने सर्वाधिक १३, संदीप नरवालने ९, विनयने ७, नीरजने ६ आणि विजयने ५ गुण मिळवले.

दुसऱ्या सामन्यात यूपी योद्धाने गतविजेत्या बंगाल वॉरियर्सचा ४०-३६ असा पराभव केला. यूपी योद्धाचा हा सलग तिसरा विजय असून ते गुणतालिकेत चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. दुसरीकडे बंगाल वॉरियर्स हा सामना गमावून पाचव्या स्थानावर आला आहे. या सामन्यात परदीप नरवालने चांगली कामगिरी केली.

हेही वाचा – IND vs SA 2nd ODI : भारतानं वनडे मालिकाही गमावली..! दक्षिण आफ्रिकानं जिंकला दुसरा सामना

युपी योद्धाला सामन्यात ५ गुण मिळाले तर बंगाल वॉरियर्सला सामन्यात केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले. या सामन्यात बंगाल वॉरियर्सचा कर्णधार मनिंदर सिंगने सर्वाधिक १९ गुण मिळवले. परदीप नरवाल आणि सुरेंदर गिल यांना प्रत्येकी ९ रेड पॉइंट मिळाले. बचावात सुमितने ४ तर नितेश कुमारने ३ गुण मिळवले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pkl dabang delhi vs haryana steelers and bengal warriors vs up yoddha adn

Next Story
IND vs SA : रन घेण्याच्या नादात राहुल-पंतनं केली ‘मोठी’ चूक; पाहा LIVE मॅचमध्ये नक्की घडलं काय
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी