गतवेळचा विश्वविजेता सेबॅस्टीयन व्हेटेल याने मलेशियन ग्रां.प्रि.शर्यतीत पोलपोझिशन मिळविली. पावसामुळे व्यत्यय निर्माण झालेल्या पात्रता शर्यतीत त्याने एक मिनिट ४९.६७ सेकंद वेळ नोंदविली.
 फेरारी संघाचे स्पर्धक फेलिप मासा (१ मि.५०.५८७ सेकंद) व फर्नान्डो अलोन्सो (१ मि.५०.७२७ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळविले. मर्सिडीज संघाचा लेविस हॅमिल्टन याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. रेड बुल संघाचे मार्क वेबेर व मर्सिडीज संघाचा निको रोसबर्ग हे अनुक्रमे पाचव्या व सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले. किमी रेक्कोनन हा दहाव्या क्रमांकावर फेकला गेला.
पात्रता शर्यतीच्या वेळी मुसळधार पावसामुळे थोडासा व्यत्यय निर्माण झाला होता. रविवारी होणाऱ्या मुख्य शर्यतीच्या वेळीही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pole position to sebastian vettel