चढाईपटूंनी केलेल्या निराशाजनक कामगिरीमुळे पुणेरी पलटण संघाला घरच्या मैदानावर खेळताना पराभवाचा सामना करावा लागला. गुजरात फॉर्च्युनजाएंट संघाने पुणेरी पलटणचा 35-20 ने पराभव केला. गुजरातच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळाचं प्रदर्शन केलं. या विजयासह गुजरातने अ गटात यू मुम्बाला मागे टाकत पुन्हा एकदा पहिलं स्थान पटकावलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरातच्या चढाईपटूंनी आज पुण्याच्या बचावफळीला सुरुवातीपासून खिंडार पाडलं. सचिन, प्रपंजन, रोहित गुलिया यांनी आश्वासक गुणांची कमाई केली. महत्वाची गोष्ट म्हणजे गुजरातच्या बचावफळीतले सर्व खेळाडू आज भलत्याच जोशात होते. पुण्याचा पुनरागमन करण्याचा प्रत्येक प्रयत्न गुजरातने हाणून पाडला. ऋतुराज कोरावी, सुनील कुमार, परवेश भैंसवाल यांनी पुण्याच्या चढाईपटूंच्या चांगल्या पकडी केल्या.

पुण्याकडून बचावफळीत गिरीश एर्नाक, संदीप नरवाल यांनी मिळून 11 गुण कमावले. मात्र मोक्याच्या क्षणी पुण्याचा एकही चढाईपटू आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करु शकला नाही. गुरुनाथ मोरे, अक्षय जाधव आणि मोनू या त्रिकुटाने मिळून अवघे 6 गुण कमावले. याचा फटका पुण्याच्या संघाला सामन्यात बसला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi 018 season 6 gujrat fortunegiants beat puneri paltan