प्रो-कबड्डी लीग : कधी, कुठे आणि कसे पाहता येणार सामने? जाणून घ्या एका क्लिकवर!

करोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती, पण यंदा ती आयोजित केली जात आहे.

pro kabaddi league 2021 telecast channels when and where to watch live streaming
प्रो कबड्डी लीग

प्रो-कबड्डी लीग २०२१ स्पर्धा २२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. करोनामुळे गेल्या वर्षी ही लीग होऊ शकली नव्हती, त्यानंतर यंदा ती आयोजित केली जात आहे. यामध्ये एकूण १२ संघ सहभागी होत असून, ही लीग बेंगळुरू येथे होणार आहे. मात्र, यावेळी हे सामने प्रेक्षकांविना रिकाम्या स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पण प्रेक्षक टीव्हीवर त्याचा आनंद घेऊ शकतात.

पण सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे होणार, मोबाईलद्वारे सामने कसे आणि कुठे बघता येणार? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहेत. येथे जाणून घ्या तपशील..

प्रो-कबड्डी लीगचे थेट प्रक्षेपण कुठे होणार?

प्रो-कबड्डी लीगचा आठवा हंगाम स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या सर्व चॅनेलवर पाहता येईल.

प्रो-कबड्डी लीगचे ऑनलाइन स्ट्रीमिंग कुठे पाहता येईल?

डिस्ने प्लस आणि हॉटस्टार या अॅप्सवरही तुम्ही सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

सामन्यांच्या वेळा काय असतील?

प्रो-कबड्डी लीगमध्ये दररोज दोन ते तीन सामने खेळले जातील. मात्र, तिन्ही सामन्यांची वेळ वेगळी असेल. जिथे पहिला सामना संध्याकाळी ७:३० वाजता, दुसरा सामना ८:३० वाजता आणि तिसरा सामना रात्री ९:३० वाजता खेळवला जाईल.

हेही वाचा – VIDEO : हसून हसून पाँटिंगच्याही डोळ्यात आलं पाणी; जो रूटच्या ‘प्रायव्हेट पार्ट’ला लागला बॉल अन्..!

पहिल्या दिवशी, बेंगळुरू बुल्स विरुद्ध यू मुंबा, तेलुगु टायटन्स विरुद्ध तामिळ थलायवास आणि बंगाल वॉरियर्स विरुद्ध यूपी योद्धा यांच्यात तीन सामने होतील. त्यामुळे या सर्व संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. ही स्पर्धा २० जानेवारीपर्यंत खेळवली जाणार आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pro kabaddi league 2021 telecast channels when and where to watch live streaming adn

Next Story
Year Ender 2021: आनंदी आनंद गडे..! टोक्यो ऑलिम्पिक अन् भारत; ‘या’ ७ पदकांमुळे देशात उसळली आनंदाची लाट!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी