प्रो-कबड्डीच्या सहाव्या पर्वात पाटणा पायरेट्सच्या प्रदीप नरवालने ऐतिहासीक कामगिरीची नोंद केली आहे. आतापर्यंतच्या सहा हंगामांमध्ये चढाईत ८०० गुणांचा टप्पा पार करणारा प्रदीप नरवाल पहिला खेळाडू ठरला आहे. पुणेरी पलटण विरुद्धच्या सामन्यात प्रदीपने हा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. पाटणा पायरेट्सने पुणेरी पलटणवर ५३-३६ अशी मात केली. प्रदीपने पुणेरी पलटण संघाविरुद्ध चढाईमध्ये तब्बल २७ गुणांची कमाई केली. त्याच्या या झंजावाताला रोखणं पुण्याच्या एकाही बचावपटूला जमलं नाही. पुणेरी पलटणविरुद्ध सामन्याआधी प्रदीपच्या खात्यात ७८३ गुण जमा होते, पुण्याविरुद्ध सामन्यात प्रदीपने धडाकेबाज खेळ करत अनोखा विक्रम आपल्या नावे केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रो-कबड्डीच्या इतिहासात आतापर्यंत चढाईमध्ये सर्वाधिक गुण मिळवणारे खेळाडू –

  • प्रदीप नरवाल – पाटणा पायरेट्स – ८१० गुण
  • राहुल चौधरी – तेलगू टायटन्स – ७७१ गुण
  • अजय ठाकूर – तामिळ थलायवाज – ६९७ गुण
  • दिपक निवास हुडा – जयपूर पिंक पँथर्स – ६२९ गुण
  • काशिलींग अडके – ५५३ गुण
मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pro kabaddi 2018 season 6 pradeep narwal becomes first player to cross 800 point mark in raiding