सुनील गुलाटी
वय : ५५, अमेरिका
अनुभव : अमेरिकन सॉकर महासंघाचे अध्यक्ष
जिंकण्याची संधी : कमी
शेख अहमद
वय : ५१, कुवेत
अनुभव : आशियाई ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष.
जिंकण्याची संधी : पूर्वेकडील संघटनांचा पाठिंबा
प्रिन्स अली हुसेन
वय : ३९, जॉर्डन
अनुभव : जॉर्डनिअन फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष. जिंकण्याची संधी : खूप कमी
जेरॉम कॅम्पेन
वय : ५६, फ्रान्स
अनुभव : फिफामध्ये ११ वष्रे कार्यरत.
जिंकण्याची संधी : प्रसिद्धीची आवश्यकता
लुइस फिगो
वय : ४२, पोर्तुगीज
अनुभव : निवृत्त फुटबॉलपटू.
जिंकण्याची संधी : पोर्तुगीज संघटनांचा पाठिंबा
चंग माँग – जून
वय : ६३, दक्षिण कोरिया
अनुभव : फिफा कार्यकारिणी समितीचे माजी सदस्य. जिंकण्याची संधी : आशियातून पाठिंबा
झिको
वय : ६२, ब्राझील. अनुभव : माजी खेळाडू जिंकण्याची संधी : दक्षिण आफ्रिकन संघटनांचा पाठिंबा
मिचल प्लॅटिनी
वय : ५९, फ्रान्स
अनुभव : यूएफा अध्यक्ष
जिंकण्याची संधी : निवडणुकीला उभे राहिल्यास सर्वाधिक
डेव्हिड गिनोला
वय : ४८, फ्रान्स
अनुभव : २०१२ पॅरिस ऑलिम्पिक व २०१८ फ्रान्स रायडर चषकाचा सदिच्छादूत जिंकण्याची संधी : नाही
मायकेल व्ॉन प्राग
वय : ६७, नेदरलॅण्ड
अनुभव : यूएफाचे कार्यकारिणी सदस्य आणि नेदरलॅण्ड फुटबॉल असोसिएशचे अध्यक्ष
जिंकण्याची संधी : युरोपियन संघटनेच्या पाठिंब्यावर अवलंबून
शेख सलमान
वय : ४९ , बहरीन
अनुभव : फिफाचे उपाध्यक्ष आणि आशियाई फुटबॉल संघटनेचे प्रमुख
जिंकण्याची संधी : आशियाई संघटनांकडून चांगला पाठिंबा
फिफावरील आरोप क्लेशदायक – बेकहॅम
फेडरेशन इंटरनॅशनल डी फुटबॉल असोसिएशनवर (फिफा) सध्या होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप क्लेशदायक, अस्वीकाहार्य आणि फार वाईट असल्याचे मत इंग्लंडचा माजी कर्णधार डेव्हिड बेकहॅमने व्यक्त केले. या आरोपांमुळे सेप ब्लाटर यांनी अध्यक्षपदावरून राजीनामा दिला आणि आता चक ब्लेझर यांच्या कबुलीनंतर या प्रकरणाला नवे वळण आले आहे. ब्लेझर यांनी १९९८ व २०१०च्या विश्वचषक स्पध्रेसाठी लाच घेतल्याची कबुली दिली आहे. ‘‘फुटबॉल वर्तुळात सध्या सुरू असलेल्या बाबी फुटबॉलसाठी क्लेशदायक, अमान्य आणि फार वाईट आहेत,’’ असा पुनर्उल्लेक बेकहॅमने केला.