South Africa tour of pakistan: आशिया चषकानंतर दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात तिन्ही फॉरमॅटमधील मालिका खेळवली जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तान दौऱ्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यात कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळेल. या मालिकांसाठी संघ जाहीर करताना दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यात निवृत्तीतून माघार घेतलेल्या खेळाडूचा समावेश आहे.

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेत दोन सामने असतील, तर टी-२० आणि एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी तीन सामने असतील. या तिन्ही मालिकांसाठी दक्षिण आफ्रिकेने आपला संघ जाहीर केला आहे. दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान दौरा १२ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान लाहोर आणि रावळपिंडी येथे खेळल्या जाणाऱ्या दोन कसोटी होतील. कसोटी कर्णधार तेंबा बावुमा हा पायाच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत एडन मारक्रमकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर वनडे संघ जाहीर होताच सर्वांनाच संघ पाहताच धक्का बसला. कारण या संघात दक्षिण आफ्रिकेचा उत्कृष्ट सलामीवीर क्विंटन डी कॉकच्या नावाचा समावेश आहे. ज्याने निवृत्ती घेतली होती.

डेव्हिड मिलरला टी-२० संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर मॅथ्यू ब्रीट्झके एकदिवसीय संघाचे नेतृत्व करेल. यातील सर्वात मोठं आश्चर्य म्हणजे क्विंटन डी कॉकचं पुनरागमन. २०२३ च्या विश्वचषकानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती, परंतु आता त्याने क्रिकेटमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी डी कॉकची टी-२० आणि एकदिवसीय दोन्ही संघात निवड झाली आहे.

पाकिस्तानविरूद्ध वनडे मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

मॅथ्यू ब्रीट्झके (कर्णधार), कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, गेराल्ड कुत्सिया, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, डोनोव्हन फरेरा, ब्योर्न फोर्टुइन, जॉर्ज लिंडे, क्वेना म्फाका, लुंगी एनगिडी, नकाबा पीटर्स, लुआन-ड्रे प्रिटोरियस आणि सिनेथेम्बा केशिले.

पाकिस्तानविरूद्ध टी-२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

डेव्हिड मिलर (कर्णधार), कार्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, नांद्रे बर्गर, गेराल्ड कुत्सिया, क्विंटन डी कॉक, डोनोव्हन फेरेरा, रीझा हेंड्रिक्स, जॉर्ज लिंडे, क्वेना मफाका, लुंगी एनगिडी, नकाबा पीटर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, एंडिले सिमेलेन, लिजाड विलियमस

पाकिस्तानविरूद्ध कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ

एडन मारक्रम (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, कॉर्बिन बॉश, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी झोर्झी, झुबेर हमझा, सायमन हार्मर, मार्को जॅन्सन, केशव महाराज*, विआन मुल्डर, सेनुरन मुथुसामी, कागिसो रबाडा, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, प्रिनेलन सुब्रेयन आणि काईल वेरेन