क्ले कोर्टचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा स्पेनचा टेनिसपटू राफेल नदालने पुन्हा एकदा जागतिक टेनिस क्रमवारीत अव्वल स्थान पटकाविले आहे. सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकाविचला मागे टाकून त्याने पहिले स्थान मिळविले आहे.
बीजिंगमध्ये सुरू असलेल्या चीन ओपन टेनिस स्पर्धेत उपांत्य फेरीच्या सामन्यात नदालचा प्रतिस्पर्धी थॉमस बर्डीचने दुखापतीमुळे सामना सोडल्याने नदालचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित झाला. नदालच्या या विजयामुळे तो पुन्हा एकदा टेनिस क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोचला. जुलै २०११ नंतर तब्बल दोन वर्षांनी नदालला क्रमवारीतील अव्वल स्थान पुन्हा मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rafael nadal returns to world number one