भाऊ-बहिणीचे नाते हे या जगातील सर्वात मौल्यवान नाते आहे, असे म्हटले जाते. हे नाते अधिक वृद्धिंगत करण्यासाठी दरवर्षी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. भावा-बहिणींत फक्त रक्ताचे नाते नसते, तर ते प्रेमाचे बंधन असते. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग देखील भारतीय संघाच्या एका क्रिकेटपटूच्या पत्नीला आपली बहीण मानतो. सलामीवीर फलंदाज रोहित शर्माची पत्नी युवीला आपला भाऊ मानते. रोहित-रितिकाच्या लग्नापूर्वी युवीने रोहितने रितिकापासून दूर राहण्यासंबंधी तंबी दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह ही युवराजची बहीण आहे. त्यांच्यात रक्ताचे नाते नसले तरी, ती युवीला राखी बांधते. युवराज आणि रितिका यांची भेट फक्त एका क्रिकेट सामन्याशी झाली होती. रितिकाने त्यावेळी क्रीडा व्यवस्थापक म्हणून काम केले होते. युवराज आणि रितिका अनेकदा कामाच्या संदर्भात भेटत असत. युवराज नेहमी तिला आपुलकीने हाक मारत असे आणि बहिणीप्रमाणे तिची काळजी घेत असे. तेव्हापासून रितिकाने युवीला राखी बांधायला सुरुवात केली.

रितिका, रोहित, युवराज आणि हेजल

 

हेही वाचा – रक्षाबंधन : प्रसिद्धीपासून दूर असलेली विराटची ‘सावली’, जाणून घ्या कोहलीच्या मोठ्या बहिणीबद्दल

युवीची रोहितला तंबी

रोहित आणि रितिकाची भेटही युवराजनेच घडवून आणली होती. मात्र एकदा त्याने रोहित शर्माला माझ्या बहिणीपासून दूर राहण्यास सांगितले होते. रोहित म्हणाला, ”रितिका आणि युवराज एका प्रमोशनल शूटसाठी भेटले होते. या दरम्यान, युवराज माझ्याकडे आला आणि म्हणाला, ती माझी बहीण आहे .. तिच्यापासून दूर राहा”

रोहित-रितिकाचे लग्न

मात्र, युवराजला नंतर दोघांचे प्रेम समजले. रोहित-रितिका कायम एकत्र होते. रोहितने मुंबईतील बोरिवली स्पोर्ट्स क्लबमध्ये रितिकाला गुडघ्यावर बसून प्रपोज केले. त्यानंतर रितिकाने रोहितचा प्रस्ताव लगेच स्वीकारला. १३ डिसेंबर २०१५ मध्ये रोहित आणि रितिकाचे लग्न झाले. युवी दोघांचाही मोठा भाऊ लग्नात म्हणून उपस्थित होता. करोनामुळे आणि इंग्लंड दौऱ्यामुळे यावेळी रितिका आणि युवीला रक्षाबंधन साजरे करता येणार नाही, पण तिचे प्रेम युवीसाठी नेहमीच असेल. रोहित शर्मा आणि रितिका सध्या इंग्लंडमध्ये आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raksha bandhan yuvraj singh warned rohit sharma to stay away from his sister ritika sajdeh adn