साखळी फेरीतल्या आपल्या अखेरच्या सामन्यात त्रिपुरावर मात केल्यानंतर मुंबईच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत ‘खडूस’ मुंबईची गाठ तुल्यबळ कर्नाटकविरुद्घ पडणार आहे. ७ ते ११ डिसेंबरदरम्यान विदर्भ क्रिकेट असोसिएसनच्या मैदानावर हा सामना रंगणार आहे. कर्नाटकविरुद्ध सामना हा मुंबईसाठी ‘करो या मरो’ परिस्थितीचा असल्याने या सामन्यात मुंबईच्या संघासमोर मोठं आव्हान असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यासाठी मुंबईच्या निवड समितीने अभिषेक नायरला पुन्हा एकदा संघाबाहेर ठेवणं पसंत केलं आहे. याचसोबत दुखापतग्रस्त शार्दुल ठाकूरलाही संघात स्थान मिळू शकलेलं नाहीये. याऐवजी सागर त्रिवेदी, शिवम मल्होत्रा, शिवम दुबे आणि शुभम रांजणे यांना संघात जागा मिळालेली आहे.

कर्नाटकविरुद्ध सामन्यासाठी असा असेल मुंबईचा संघ –

आदित्य तरे (कर्णधार), सुर्यकुमार यादव (उप-कर्णधार), धवल कुलकर्णी, सिद्धेश लाड, जय बिस्ता, पृथ्वी शॉ, अखिल हेरवाडकर, सुफियान शेख, आकाश पारकर, कर्ष कोठारी, सागर त्रिवेदी, विजय गोहील, शिवम मल्होत्रा, शिवम दुबे आणि शुभम रांजणे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranji trophy 2017 18 mca announced team for the quarter final against karnataka no place for injured shardul thakur