ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाने आणि गोलंदाजांच्या हाराकिरीने त्रस्त झालेल्या शेन वॉर्नने ट्विटर म्हटले होते की, ‘पुढील वर्षी होणाऱ्या अ‍ॅशेससाठी कर्णधार मायकेल क्लार्कच्या मदतीकरिता पुनरागमन करू शकतो.’ मात्र सहज म्हणून केलेल्या या मस्करीमुळे प्रसारमाध्यमांमध्ये वॉर्नच्या पुनरागमनाच्या चर्चाना ऊत आला. यामुळे अखेर वॉर्नला याप्रकरणी क्लार्कची माफी मागावी लागली. ‘कसोटी दर्जाच्या क्रिकेटमध्ये आजही मी माझे कौशल्य सिद्ध करू शकतो. माझा लाडका मित्र मायकेल क्लार्कने मला पुनरागमनाची गळ घातली तर मी निश्चितच परतू शकतो. आफ्रिकेविरुद्धचा सामना बघतानाच मला दिवाणखान्यातून थेट मैदानात उतरावे असे वाटत होते, असे वॉर्नने म्हटले होते.     

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Return for ashesh news refute by warn