India vs Pakistan Super Four Match Updates: भारत आणि पाकिस्तान संघांत आशिया चषकातील सुपर फोर फेरीतील तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्याच्या सुरुवातीला रोहित शर्मा पाकिस्तानी गोलंदाजांविरुद्ध बचावात्मक दिसला, पण पहिल्याच षटकात त्याने शाहीन आफ्रिदीच्या चेंडूवर षटकार ठोकत इतिहास रचला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो दुसऱ्या क्रमांकावर आला आणि पॉल स्टारलिंगचा विक्रम मोडला. एवढेच नाही तर या सामन्यात त्याने सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागसारख्या फलंदाजांच्या या एलिट यादीतही स्थान मिळवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने मोडला पॉल स्टर्लिंगचा विक्रम –

रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्यात पहिल्याच षटकात षटकार मारला आणि मोठा विक्रम केला. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याच्या आधी पॉल स्टर्लिंग दुसऱ्या क्रमांकावर होता, त्याने पहिल्याच षटकात १४ षटकार मारले होते, पण रोहित शर्मा आता १५ षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत मार्टिन गप्टिल १७ षटकारांसह पहिल्या स्थानावर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्या षटकांत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –

१७ – मार्टिन गप्टिल
१५ – रोहित शर्मा
१४ – पॉल स्टारलिंग
१२ – एविन लुईस
१० – डेव्हिड वॉर्नर<br>१० – कॉलिन मुनरो
१० – ड्वेन स्मिथ

हेही वाचा – IND vs PAK: रोहित शर्माने आफ्रिदीविरुद्ध षटकार ठोकत रचला इतिहास, ‘हा’ कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

सचिन आणि सेहवागच्या यादीत रोहितने मिळवले स्थान –

रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्धच्या सुपर फोर सामन्यात मैदानात उतरताच मोठी कामगिरी केली. भारतासाठी सलामीवीर म्हणून हा त्याचा ३०० वा सामना होता आणि तो सचिन आणि सेहवागच्या विशेष यादीत सामील झाला. रोहितपूर्वी या दोन्ही फलंदाजांनी भारतासाठी सलामीवीर म्हणून ३०० किंवा त्याहून अधिक सामने खेळले आहेत. सचिनने सलामीवीर म्हणून ३४६ सामने खेळले तर सेहवागने ३२१ सामने खेळले आहेत.

हेही वाचा – IND vs PAK: शुबमन गिलचा झेल सोडणे पाकिस्तान संघाला पडले महागात, VIDEO होतोय व्हायरल

भारतासाठी सलामीवीर म्हणून सर्वाधिक सामने खेळणारे फलंदाज –

३४६ – सचिन तेंडुलकर
३२१ – वीरेंद्र सेहवाग
३०० – रोहित शर्मा
२६८ – शिखर धवन

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma broke paul sterlings record for most sixes in the first over in international cricket in ind vs pak vbm