भारतीय संघाचा मराठमोळा अष्टपैलू खेळाडू सध्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. वन-डे मालिकेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आलेली आहे. गेल्या काही मालिकांमध्ये केदारला फलंदाजीत हवीतशी कामगिरी करता आलेली नाही. याचसोबत गोलंदाजीतही त्याची जादू ओसरताना दिसत आहे. यासाठी केदार स्थानिक क्रिकेटमध्ये अधिक सरावावार भर देतो आहे. विंडीजविरुद्धची वन-डे सामन्यांची मालिका ही केदारसाठी महत्वाची संधी असणार आहे.
आपल्या सरावादरम्यानचा एक फोटो केदार जाधवने नुकताच इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला होता.
