देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. जवळपास दोन महिन्यांच्या लॉकडाउनमुळे सारेच कंटाळले आहेत, पण करोनाचा फैलाव रोखण्यासाठी घराबाहेर न पडणे तितकेच गरजेचे आहे. त्यामुळे हल्ली क्रिकेटपटू एकमेकांना घरातच चॅलेंज देत आहेत.

“रोज-रोज नाही…”; धोनीच्या चपळाईला जेव्हा बांगलादेशी फलंदाज मात देतो

भारतीय माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, सलामीवीर रोहित शर्मा आणि फिरकीपटू हरभजन सिंग या तिघांना किपइटअप चॅलेंज दिला होता. बॅट उभी धरून बॅटेच्या कडेने (edge) चेंडू शक्य तितक्या वेळ टोलवत राहणे असा हा चॅलेंज आहे. युवराजने स्वत: घराच्या टेरेसवर हा चॅलेंज पूर्ण करून मग पुढे सचिन, रोहित आणि हरभजन या तिघांना चॅलेंज दिला.

‘या’ देशातल्या फॅन्सकडून अजिबात पाठिंबा मिळत नाही – रोहित शर्मा

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने हा चॅलेंज सहज पूर्ण केला. इतकेच नव्हे तर सचिनने हा चॅलेंज चक्क डोळ्यावर पट्टी बांधून पूर्ण केला. सचिनने आपल्या इन्स्टाग्रामवर दोन व्हिड़ीओ पोस्ट केले. त्यात पहिल्या व्हिडीओमध्ये सचिनने हा चॅलेंज पूर्ण केला. तर दुसऱ्या व्हि़डीओमध्ये सचिनने डोळ्यावर बांधलेल्या काळ्या पट्टीचं रहस्यदेखील युवीला सांगितलं.

ते तीन शब्द अन्… द्रविड-लक्ष्मणने खेळून काढला अख्खा दिवस

दरम्यान, या आधी सचिनने गांगुलीच्या घरचा एक जुना फोटो शेअर केला होता. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुली या दोघांनी भारतीय क्रिकेटला १९९९ च्या विश्वचषकानंतर एक नवी सुरूवात दिली. या दोघांनी सलामीवीर म्हणून धडाकेबाज कामगिरी केली. केवळ क्रिकेटच्या मैदानातच नव्हे, तर मैदानाबाहेरही त्यांची घनिष्ठ मैत्री होती. याचाच एक पुरावा देणारा फोटो सचिनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. सौरव गांगुलीच्या घरात सचिन आणि सौरव दोघे जेवणाचा आस्वाद घेत आहेत असा फोटो त्याने पोस्ट केला होता. “दादीच्या (गांगुली) घरी एका संध्याकाळी मी गेलो होतो. त्याच्या घरातील भोजन आणि पाहुणचाराने मी तृप्त झालो. गांगुली, तुझी आई तंदुरूस्त राहो हीच प्रार्थना”, असे कॅप्शन त्याने फोटोला दिले होते.