भारतीय खेळाडूंनी आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कमी पदके मिळवावित, अशीच अपेक्षा आर्थिकदृष्टय़ा अडचणीत असलेली भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) करीत आहे.
सार्वत्रिक निवडणुकांमुळे साइ संस्थेला प्रायोजकांची कमतरता भासत आहे. या संदर्भात साइचे सरसंचालक जिजी थॉमस यांनी सांगितले, की यंदा राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धा होत आहेत. मात्र अंतरिम अंदाजपत्रकात आम्हाला फारच कमी निधी देण्यात आला आहे. या दोन्ही स्पर्धाकरिता सर्वच खेळांच्या राष्ट्रीय संघटनांनी वाढीव निधीची मागणी केली आहे. प्रामुख्याने खेळाडूंकरिता प्रशिक्षक व परदेशातील स्पर्धात्मक सराव याकरिता आर्थिक मदत मागण्यात आली आहे. मात्र जोपर्यंत केंद्रात नवीन सरकार येत नाही तोपर्यंत आम्ही काहीच करू शकणार नाही.
खेळाकरिता १२१९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी १६५ कोटी रुपये राष्ट्रीय संघटनांकरिता राखीव ठेवण्यात आले आहेत. २०१० मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाचे वेळी भारतीय पथकाच्या तयारीसाठी ६७८ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला होता.