दुखापतीमुळे गेले काही महिने मैदानाबाहेर असलेल्या सायना नेहवालला, आपल्या पहिल्याच स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला आहे. थायलंड ओपन स्पर्धेच्या दुसऱ्याच फेरीत सायनाला आपला गाशा गुंडाळावा लागला. जपानची बिगर मानांकीत खेळाडू सायका ताकाहाशीने सायनावर मात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सातव्या मानांकीत सायना नेहवालने पहिला सेट २१-१६ च्या फरकाने जिंकत चांगली सुरुवात केली होती. मात्र त्यानंतरच्या सेटमध्ये ताकाहाशीने दमदार पुनरागमन करत ११-२१ आणि १४-२१ अशी खेळी करत सायनाचं आव्हान मोडून काढलं. सायना नेहवालच्या या पराभवामुळे या स्पर्धेतलं भारतीय महिलांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. सिंधूने या स्पर्धेतून ऐनवेळी माघार घेतली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal crashes out in second round of thailand open psd