दुखापतीमधून मी आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली असून चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेद्वारे या मोसमातील पहिले विजेतेपद मिळवीन, असा आत्मविश्वास ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती सायना नेहवाल हिने शांघायमध्ये व्यक्त केला. गतवर्षी चीन खुल्या स्पर्धेत ती दुखापतीमुळे खेळू शकली नव्हती. तिला पहिल्या फेरीत पात्रता फेरीतून मुख्य फेरीत स्थान मिळविणाऱ्या खेळाडूशी खेळावे लागणार आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या पाच क्रमांकांमध्ये पुन्हा स्थान मिळविण्यासाठीही सायना उत्सुक झाली आहे. ‘‘गेल्या काही महिन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव व दुखापती यामुळे तिला अपेक्षेइतके अव्वल दर्जाचे यश मिळविता आलेले नाही.या स्पर्धेत जगातील सर्वच अव्वल दर्जाचे खेळाडू भाग घेत असल्यामुळे विजेतेपद मिळविणे ही अतिशय अवघड कामगिरी मानली जाते. तथापि या स्पर्धेसाठी गेले तीन आठवडे मी कसून सराव केला आहे,’’ असे सायनाने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Nov 2013 रोजी प्रकाशित
चीनमधील स्पर्धेसाठी सायना नेहवाल सज्ज
दुखापतीमधून मी आता पूर्णपणे तंदुरुस्त झाली असून चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेद्वारे या मोसमातील पहिले विजेतेपद मिळवीन
First published on: 12-11-2013 at 07:10 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saina nehwal eyes seasons 1st title at china open super series