नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिकसाठीचा ‘अ’ पात्रता निकष पार केल्याच्या पुढच्याच दिवशी जलतरणपटू साजन प्रकाश याने रोममधील सेटे कॉली करंडक जलतरण स्पर्धेत दमदार कामगिरी कायम ठेवली. त्याने २०० मीटर फ्रीस्टाईल प्रकारात नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. प्रकाशने १.४९.७३ सेकंद अशी कामगिरी करत २०१०मध्ये वीरधवल खाडेने (१.४९.८६ सेकंद) रचलेला विक्रम मोडीत काढला. प्रकाशने या महिन्यात तिसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. प्रकाशने शनिवारी पुरुषांच्या २०० मीटर बटरफ्लाय प्रकारात १.५६.३८ सेकंद अशी वेळ नोंदवत ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारा भारताचा पहिला जलतरणपटू होण्याचा मान पटकावला होता.