डिलाइल रोडवरील बीडीडी चाळीतील ललित कला भवनाच्या मैदानात शेकडो प्रेक्षक जमलेले.. वातावरण उत्कंठावर्धक होते.. प्रत्येक जण ‘पलटी मार’, ‘चीत पट’ कर, ‘पाय पकड’, ‘उलटा पाड’ अशा आरोळ्या देत होते.. निमित्त होते ते कामगार केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीचे.. हे सारे भारावलेले वातावरण कुस्ती मुंबईतल्या कानाकोपऱ्यांमध्ये अजूनही जिवंत आहे आणि त्याला प्रेक्षकांचा भरघोस पाठिंबा आहे, हेचं सांगणारे होते. वारणा दूध सहकारी संस्थेच्या संग्राम पोळने अंतिम फेरीत माणगंगा संस्थेच्या आप्पा सरगरचा ५ गुणांनी पराभव करत कामगार केसरी किताब पटकावला. संग्रामला चांदीची गदा आणि रोख बक्षिसाने गौरवण्यात आले.
कुमार गटामध्ये प्रकाश कोळेकरने अटीतटीच्या अंतिम लढतीत लहान भाऊ बापूवर ८ गुणांनी विजय मिळवत कुमार केसरी किताबासह चांदीची गदा आणि रोख पारितोषिक पटकावले.
अन्य गटातील विजेते
५५ किलोपर्यंत : उमेश कांबळे, ६० किलोपर्यंत : दीपक कांबळे, ६६ किलोपर्यंत : क्रांतीकुमार पाटील, ७४ किलोपर्यंत : नितीन सकपाळ, ७४ किलोपुढील : शिवाजी पवार.
आता लक्ष्य महाराष्ट्र केसरी-संग्राम
कामगार केसरी हे माझ्या मेहनतीचे फळ आहे. दररोज ४-५ तास मी सराव करतो, त्यामुळे मला या स्पर्धेसाठी विशेष प्रयत्न करावे लागले नाहीत. महाराष्ट्रात सर्व स्पर्धामध्ये सहभागी होता यावे यासाठी मी मॅटबरोबरच मातीतही सराव करतो. या विजयाने नक्कीच आनंद झाला आहे, पण यावर मी समाधानी नाही. आता यापुढे माझे लक्ष्य महाराष्ट्र केसरी असेल. महाराष्ट्र केसरीसाठी मी आतापासूनच तयारीला लागलो आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Mar 2013 रोजी प्रकाशित
रण‘संग्राम’
डिलाइल रोडवरील बीडीडी चाळीतील ललित कला भवनाच्या मैदानात शेकडो प्रेक्षक जमलेले.. वातावरण उत्कंठावर्धक होते.. प्रत्येक जण 'पलटी मार', 'चीत पट' कर, 'पाय पकड', 'उलटा पाड' अशा आरोळ्या देत होते.. निमित्त होते ते कामगार केसरी कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीचे.. हे सारे …

First published on: 02-03-2013 at 12:03 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sangoram pole win kamgar kesari wrestling title