यंदाच्या हंगामातला दिमाखदार फॉर्म कायम राखत सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगिस जोडीने वुहान खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारली. अव्वल मानांकित सानिया-मार्टिना जोडीने हाओ चिंग चान आणि युंग जॅन चान या तैपेईच्या जोडीवर ६-२, ६-१ असा सहज विजय मिळवला. विम्बल्डन आणि अमेरिकन ग्रँड स्लॅम स्पर्धेत या जोडीने जेतेपदाची कमाई केली होती. आणखी एका विजयासह एकत्रित खेळताना हंगामातील सातवे जेतेपद पटकावण्यासाठी ही जोडी आतुर आहे.