डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा

पायाला झालेल्या दुखापतीमुळे युवा टेनिसपटू शशी मुकुंदने पाकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस चषक टेनिस लढतीतून शनिवारी माघार घेतली आहे.

‘‘भारतीय संघातील राखीव खेळाडू मुकुंदला पोर्तुगालमध्ये स्पर्धा खेळताना दुखापत झाली. पूरव राजाच्या साथीने तो ही दुहेरीची स्पर्धा खेळत होता. त्यामुळे दुर्दैवाने मुकुंद संघासह कझाकस्तानच्या दौऱ्यावर नसेल,’’ अशी माहिती भारताचे डेव्हिस चषक प्रशिक्षक झीशान अली यांनी दिली.

दुखापतीमुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातून माघार घेणारा मुकुंद हा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी रोहन बोपण्णाला खांद्याच्या दुखापतीमुळे या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. मुकुंदऐवजी एन. श्रीराम बालाजीचा संघात समावेश करण्याची शक्यता होती. परंतु इतक्या कमी कालावधीत व्हिसा प्रक्रिया होणे अशक्य आहे, असे झीशान यांनी सांगितले.