नवी दिल्ली : मी माझी सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, एखादा खेळाडू माझ्यापेक्षाही उत्तम कामगिरी करत असल्यास त्याला संधी मिळणे योग्यच आहे. परंतु भारतीय संघात पुनरागमनासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे, असे विधान अनुभवी सलामीवीर शिखर धवनने केले. धवनला गेल्या काही काळात धावांसाठी झगडावे लागले आहे. तर दुसरीकडे शुभमन गिलने सलामीला मिळालेल्या संधीचे सोने केल्यामुळे ३७ वर्षीय धवनने भारतीय एकदिवसीय संघातील स्थान गमावले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘चढ-उतार हा आयुष्याचा भागच आहे. वेळ आणि अनुभवानुसार तुम्ही अपयश पचवायला शिकता. मी नेहमीच माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एखादा खेळाडू माझ्यापेक्षाही उत्तम कामगिरी करत असल्यास त्याला संधी मिळणे योग्यच आहे. मी आयुष्यात आणि कारकीर्दीत ज्या टप्प्यावर आहे, त्याबाबत खूप समाधानी आहे. भारतीय संघात पुनरागमनासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. मला संधी मिळाली तर त्याचा खूप आनंद असेल, पण संधी न मिळाल्यासही मी फार निराश होणार नाही,’’ असे धवन म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shikhar dhawan statement deserves a chance for the best performing player ysh