भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन सध्या आपल्या परिवारासोबत दिवस घालवतोय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी शिखरची संघात निवड झाली होती. मात्र बायकोच्या आजारपणामुळे शिखरला या दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. सध्या अजिंक्य रहाणेच्या शिखरच्या अनुपस्थितीत संघात सलामीवीराची भूमिका बजावतो आहे.

शिखरची पत्नी आयेशा धवन हिच्यावर नुकतीच एक शस्त्रक्रीया करण्यात आली होती. त्यामुळे पत्नीच्या अनुपस्थितीत आपल्या घराचा सांभाळ करण्यासाठी शिखरने दौरा अर्धवट सोडण्याचा निर्णय घेतला, आणि शिखर आपली ही जबाबदारी अगदी व्यवस्थितपणे पार पाडतो आहे. आपल्या मुलांसाठी नाश्ता करतानाचा एक व्हिडिओ शिखरने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

Enjoyed making bf for my kids this morning, trying to fit in my wife shoes which i can nevr fit in… still giving my best thgh !!

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

भारतीय संघ श्रीलंकेत गेलेला असताना, आईची तब्येत बिघडल्याने अखेरच्या वन-डे सामन्यात शिखर धवनने माघार घेऊन मायदेशात परतण पसंत केलं होतं. ऑस्ट्रेलिया मालिका संपल्यानंतर न्यूझीलंड आणि श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. त्यामुळे या मालिकेपर्यंत शिखर धवन भारतीय संघात पुनरागमन करतो का हे पहावं लागणार आहे.