गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांच्या घोषणेला अखेर सोमवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. क्रीडाक्षात्राला प्रोत्साहन देण्याच्या वल्गना करणारे राज्य सरकार राज्याच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार देण्यात गेल्या कित्येक वर्षांपासून टाळाटाळ करत आहे. पण सोमवारी या पुरस्कारांची घोषणा केली जाण्याची शक्यता राज्य क्रीडा खात्याकडून व्यक्त करण्यात आली. शिवछत्रपती पुरस्कार विजेत्यांच्या यादीला अंतिम स्वरूप देणे बाकी असून त्याबाबतचा अध्यादेश सोमवारी काढण्यात येईल. यादी अंतिम झाल्यानंतर ती संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे क्रीडा खात्याकडून सांगण्यात आले.
गेली तीन वर्षे पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली नसून चौथ्या वर्षांच्या पुरस्कारासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे, असेही क्रीडा खात्याकडून सांगितले.