वरिष्ठ नेमबाज मानवजीत सिंग संधूने जागतिक नेमबाजी क्रमवारीत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. गेल्या महिन्यात टुस्कॉन, अमेरिका येथे झालेल्या नेमबाजी विश्वचषकात ट्रॅप प्रकारात खेळताना सुवर्णपदकावर कब्जा केला होता. विश्वचषकाआधी मानवजीत १६व्या स्थानी होता. सुवर्णपदकासह मानवजीतने क्रमवारीत दमदार आगेकूच केली आहे. ३७ वर्षीय मानवजीतच्या नावावर १२२८ क्रमवारी गुण आहेत. रशियाचा अॅलेक्सी अलिपोव्ह अव्वल तर इटलीचा जिओव्हानी पेलीइलो दुसऱ्या स्थानी आहे. मानवजीतने दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या मायकेल डायमंडला नमवत सुवर्णपदकाची कमाई केली होती.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 02-05-2014 at 08:23 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shooter manavjit sandhu rises to world no