मुंबई खो-खो संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई जिल्हास्तरीय सबज्युनिअर गट अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने तर किशोरींमध्ये श्री समर्थ संघाने जेतेपदावर नाव कोरले.
ओम समर्थने सरस्वती स्पोर्ट्स क्लबला २ गुणांनी नमवले. मध्यंतराला दोन्ही संघांची बरोबरी होती, मात्र विश्रांतीनंतर जोरदार आक्रमणाच्या जोरावर ओम समर्थने विजय मिळवला. ओम समर्थतर्फे सनी तांबे, संजील कनगुटकर, शुभम शिवगण यांनी सुरेख खेळ केला. किशोरी गटात श्री समर्थ व्यायाम मंदिरने सरस्वती स्पोर्ट्स क्लबवर एक डाव आणि एका गुणाने मात केली. गौरी आंबेडकर, सिद्धी हरमळकर, पूर्वा बांदेकर श्री समर्थच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या. सरस्वती स्पोर्ट्स क्लबचे खुशबू सुतार आणि तुषार बाणे सवरेत्कृष्ट आक्रमक खेळाडू ठरले. श्री समर्थची सिद्धी हरमळकर आणि ओम समर्थचा शुभम शिवगण यांची सवरेत्कृष्ट संरक्षक म्हणून निवड झाली. श्री समर्थची पूर्वा बांदेकर तर ओम समर्थचा संजील कनगुटकर सवरेत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू पुरस्काराचे मानकरी ठरले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2013 रोजी प्रकाशित
श्री समर्थ, ओम समर्थ विजेते
मुंबई खो-खो संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मुंबई जिल्हास्तरीय सबज्युनिअर गट अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत किशोर गटात ओम समर्थ भारत व्यायाम मंदिरने तर किशोरींमध्ये श्री समर्थ संघाने जेतेपदावर नाव कोरले. ओम समर्थने सरस्वती स्पोर्ट्स क्लबला २ गुणांनी नमवले.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 23-01-2013 at 12:49 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri samartha and om samrtha wins