पी. व्ही. सिंधूसह दुहेरी प्रकारातील खेळाडूंच्या पराभवामुळे सिंगापूर बॅडमिंटन स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
चीनच्या ही बिंगजिओने सिंधूवर ११-२१, २१-१४, २१-१४ अशी मात केली. सिंधूने दिमाखदार खेळासह पहिला गेम जिंकला. दुसऱ्या गेममध्ये बिंगजिओने चिवट खेळ करत बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये दोघींमध्ये प्रत्येक गुणासाठी जोरदार मुकाबला रंगला. मात्र, बिंगजिओने सलग सात गुण पटकावत सामना जिंकला.
इंडोनेशियाच्या मोहम्मद अहसान व हेंद्रा सेटिआवान जोडीने अक्षय देवलकर व प्रणव चोप्रावर २१-१२, २१-१२ असा़, तर चीनच्या झ्यू चेन आणि एमए जिन जोडीने प्रणव चोप्रा व एन. सिक्की रेड्डीवर २१-१५, २१-१९ असा विजय मिळवला.